१. | विभागाचे नाव | प्रमुख लेखापाल (वित्त) / प्रमुख लेखापाल (कोषागार) |
२. | विभागीय सेवा | खात्याची मुख्य कामे :- प्रमुख लेखापाल खात्याच्या मुख्य कामांचे स्थूलमानाने खालीलप्रमाणे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. अ) वित्तीय कामे ब) कोषागाराची कामे अ) वित्तीय कामे :- i) अर्थसंकल्प: महापालिकेचे उत्पन्नाचे वित्तीय उपलब्ध साधनस्त्रोत लक्षात घेऊन प्रत्येक खात्याने मागील काळात पार पाडलेली कामगिरी व विविध खात्यांनी आगामी आर्थिक वर्षात हाती घ्यावयाची प्रस्तावित कामे / प्रकल्प व त्याकरिता मागणी केलेले अर्थसंकल्पीय अनुदान याकरिताच्या प्रस्तावांची सखोल छाननी करून प्रमुख लेखापाल (वित्त) हे आगामी वर्षाकरिताचे अर्थसंकल्प ‘अ’ (फंड कोड 11,12,60,70), अर्थसंकल्प ‘ब’ (फंड कोड 21,22,23) व अर्थसंकल्प ‘ई’ (फंड कोड 30) साठीचे उत्पन्नाचे व खर्चाचे एकत्रीत मसुदा अर्थसंकल्पीय अंदाज परिशिष्टे व आस्थापना अनुसूचिसह तयार करतात. ii) कर्जे: प्रमुख लेखापाल (वित्त) हे, महानगरपालिकेच्या भांडवली स्वरुपाच्या कामांसाठी वित्त प्रबंध करण्याकरिता आवश्यक असलेली महानगरपालिकेची कर्जे उभारणे आणि त्या कर्जाची वेळेत परतफेड होईल हे पाहणे इत्यादी कामे पार पाडतात. iii) गुंतवणुक: मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 122 मधील तरतुदींनुसार प्रमुख लेखापाल (वित्त) हे महानगरपालिकेच्या वर्ताळा निधीची वेळोवेळी गुंतवणूक करणे, गुंतवणुकीवरील व्याजाची वसुली करणे आणि बँकांकडील महानगरपालिकेच्या चालू खात्यामधील शिल्लक असलेल्या रोख रकमेचा दैनंदिन आढावा घेण्याचे कामकाज पाहतात. iv) विशेष निधी: प्रमुख लेखापाल (वित्त) हे भविष्य निर्वाह निधी, कर्जनिवारण निधी यांसह महानगरपालिकेच्या विशेष निधींची स्थापना करुन त्यांच्या नियंत्रणाचे काम करतात. v) अंतर्गत लेखापरीक्षा: प्रमुख लेखापाल (वित्त) यांच्या नियंत्रणाखाली काम करणारा कर्मचारी वर्ग विविध खात्यांनी व नागरी सुविधा केंद्रांनी वसूल केलेल्या महसुलाची आणि तो महानगरपालिकेच्या कोषागारामध्ये भरण्याच्या कामकाजाची सातत्याने लेखापरीक्षा करीत असतो. vi) खर्चावर नियंत्रण: प्रमुख लेखापाल (वित्त) यांच्या खात्यामधील कर्मचारी वर्ग मुंबई महानगरपालिका अधिनियम,1888 च्या तरतुदी, नियम आणि कार्यपध्दती तसेच अर्थसंकल्पीय तरतूद या बाबी विचारात घेऊन सर्व व्यय प्रस्तावांची छाननी करीत असतो. vii) शिक्षण निधी: प्रमुख लेखापाल (वित्त) खाते हे अर्थसंकल्प 'ई' संबंधित सर्व आर्थिक बाबींचे कामकाज पाहतात. ब) कोषागारासंबंधीची कामे:- i) महसूल जमा व अधिदान: महापालिकेची रोख रक्कम / संकलित केलेला दैनंदिन महसूल बँकेत जमा करण्यासाठी नेताना असणारी जोखीम टाळण्याकरिता आणि आस्थापनीय खर्च आणि वेळेची बचत करण्यासाठी 24 विभागांतील नागरी सुविधा केंद्रांमधून आणि विद्यमान अन्य वसूली केंद्रांमधून गोळा केलेला महानगरपालिकेचा महसूल (रोख रक्कम / धनादेश / दर्शनी धनाकर्ष इ.) कामकाजाच्या लगतच्या पुढील दिवशी भारतीय स्टेट बँकेत भरणा करण्याचे काम, ऍक्सिस बँक विभाग एक साठी, आयसीआयसीआय बँक विभाग दोन साठी आणि एचडीएफसी बँक विभाग तीन साठी सोपविले आहे. तसेच प्रमुख लेखापाल (कोषागार) हे 24 विभाग कार्यालये, मध्यवर्ती कार्यालये आणि रूग्णालयांमधील खर्चांच्या अधिदानासाठी आवश्यकतेनुसार स्टेट बँक ऑफ इंडियामधून रोख रक्कम काढण्याची व्यवस्था करीत असतात. ii) लेखे परिरक्षीत करणे: प्रमुख लेखापाल (कोषागार) हे महानगरपालिकेचे प्रमुख कोषागार अधिकारी म्हणून वैधानिक आवश्यकतेनुसार अर्थसंकल्प अ, ब आणि ई शी संबंधीत लेखे परिरक्षीत करण्याचे आणि त्या बाबतीतील वार्षिक लेख्यांना अंतिम स्वरुप देण्याचे काम पाहतात. iii) भविष्य निर्वाह निधी आणि निवृत्ती वेतनाचे अधिदान: प्रमुख लेखापाल (कोषागार) भविष्य निर्वाह निधी आणि निवृत्ती वेतनाचे लेखे परिरक्षित करतात आणि महानगरपालिका कर्मचा-यांना अनुज्ञेय असलेल्या सर्व संबंधित आर्थिक फायद्यांच्या अधिदानाचे काम पाहतात. iv संगणकावर वेतनपत्रक तयार करणे: प्रमुख लेखापाल (कोषागार) यांच्या नियंत्रणाखाली काम करणारा कर्मचारीवर्ग संगणकावर कर्मचा-यांची मासिक वेतन पत्रके तयार करुन घेण्याचे काम करतो. हे खाते सर्व पर्यवेक्षकीय कर्मचा-यांचे आणि कामगार प्रवर्गातील कर्मचा-यांचे मासिक वेतन मान्यताप्राप्त बँकांमार्फत किंवा खात्यांतर्गत कर्मचारी वर्गामार्फत देण्याचे काम करीत असते. v) आस्थापना लेखापरीक्षा: प्रमुख लेखापाल (कोषागार) यांच्या नियंत्रणाखाली काम करणारा कर्मचारीवर्ग मासिक वेतन पत्रकाची नियमित लेखापरीक्षा करीत असतो. यामध्ये प्रामुख्याने वेतन पत्रके आणि पुरवणी वेतन पत्रकांची लेखापरीक्षा करणे, पुरवणी वेतनपत्रके अधिदानासाठी मंजूर करणे आणि लेखापरीक्षांमध्ये निदर्शनास आलेल्या जादा अधिदानाची वसुली करणे या कामांचा अंतर्भाव असतो. vi) रजा पडताळणी विभाग: कर्मचा-यांचे सेवाभिलेख / रजा अभिलेख, वेतननिश्चिती, सेवानिवृत्त कर्मचा-यांचे निवृत्तीवेतनादी दावे यांचे लेखापरीक्षण करणे इत्यादी कामे रजा पडताळणी विभागातील कर्मचारीवर्ग पार पाडीत असतो. vii) गृहकर्ज विभाग: गृहकर्ज विभागातील कर्मचारीवर्ग म.न.पा. कर्मचा-यांनी स्थापन केलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना गृहकर्ज व म.न.पा. कर्मचा-यांना पूर्वी देण्यात आलेल्या वैयक्तिक गृहकर्जाची वसुली करणे, गहाणखत रद्द करणे, जामीन रद्द करणे आणि सध्या कार्यान्वित असलेल्या 4% व्याज अर्थसहाय्याबाबतची प्रकरणे दाखल करून घेणे व ती निकाली काढणे ही कामे पार पाडीत असतो. खात्याकडून पुरविल्या जाणा-या सेवा :- या खात्याकडून नागरिकांना कोणतीही थेट सेवा पुरविली जात नाही. |
३. | महत्वाच्या कार्यालयांची यादी | महत्वाच्या प्रतिष्ठापने/उभारणी यादी |
४. | महत्वाच्या उभारणीची व जोडणीची यादी | निरंक |
५. | चालू असलेले प्रकल्प | निरंक |
६. | माहितीचा अधिकार प्रथम चौकशी अधिकारी आणि प्रथम अपिल अधिकारी | जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांची यादी |
७. | कार्यालयीन लैगिंक शोशन प्रतिबंधक समिती | निरंक |
८. | महत्वाची साध्य केलेली कामे | निरंक |
९. | विशेष महत्वाच्या घटना | निरंक |
१०. | ईतर कार्यालयीन माहिती | निरंक |
| |