१. विभागाचे नाव सहाय्यक आयुक्त (मालमत्ता)
२. विभागीय सेवा महानगरपालिका भुभागाच्या मक्त्याकरिता प्रस्ताव, मक्त्याचे नुतनीकरण, मक्ता भुभागाचे हस्तांतरण प्रकरण, मक्ता भाडे आणि ज्यादा भुभाड्याची वसुली, मक्ता, परवाना आणि करार पार पाडणे.
विकास नियंत्रण नियमावली 33(7) आणि 33(9) अंतर्गत महानगरपालिका भाडेकरु मालमत्ता, कर्मचारी निवासस्थानांचा पुनर्विकास, महानगरपालिका कर्मचा-यांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थांकरिता भुभाग वाटप आणि सदर सहकारी संस्थांना मक्त्याने देण्यासाठी करारपत्र, विकास नियंत्रण नियमावली 33(10) अंतर्गत विभागांकडून मिळालेल्या पुनर्विकासाकरिता प्रस्ताव.
पुनर्विकास, नुतनीकरण, दुरुस्ती, अतिरिक्त काम, बदल, विस्तार याकरिता मक्ताधारक भुभागाच्या प्रस्तावांची छाननी आणि ज्यादा भु भाडे निश्चित करणे, वापरकर्त्यामध्ये बदल, मक्ताधारक भुभागाची पाहणी आणि भुभाधारक भुभागाच्या अखत्यारितील सर्व तांत्रिक प्रकरणे.
महानगरपालिका आयुक्तांनी निश्चित केलेल्या नियमांनुसार महानगरपालिका कर्मचा-यांना कर्मचारी निवासस्थानांचे वाटप, प्रकल्पबाधित व्यक्तींना निवासस्थानांचे वाटप.
३. महत्वाच्या कार्यालयांची यादी सहाय्यक आयुक्त (मालमत्ता) यांचे कार्यालय,
बृहन्मुंबई महानगरपालिका,
४ था मजला, विस्तारित इमारत,
महापालिका मार्ग,
मुंबई - ४०० ००१
४. महत्वाच्या उभारणीची व जोडणीची यादी निरंक
५. चालू असलेले प्रकल्प निरंक
६. माहितीचा अधिकार – प्रथम चौकशी अधिकारी व प्रथम अपिल अधिकारी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत जन माहिती अधिकाऱ्यांची नावे व पदनामे:

श्री. उल्हास रमेश देव, सहाय्यक अभियंता (सुधार-1)
श्री. हरिश झित्रुजी कोराते, सहाय्यक अभियंता (सुधार-2) (कार्यव्यवस्थेअंतर्गत)
श्री. श्रीकांत ज्ञानदेव पायगव्हाणे, सहाय्यक अभियंता (सुधार-3)
श्री. राहुल शिंदे, सहाय्यक अभियंता (सुधार-4) (कार्यव्यवस्थेअंतर्गत)
श्रीम. पद्मा श्रीकांत चव्हाण, प्रशासकीय अधिकारी (सर्वसाधारण)
श्री. दिलीप सदानंद मिस्त्री, प्रशासकीय अधिकारी (लेखा)
रिक्त, प्रशासकीय अधिकारी (स.गृ.सं)
श्रीम. स्वप्निला चिले, प्रशासकीय अधिकारी (मक्ता-1)
श्रीम. श्वेता संजय गुंडेवार, प्रशासकीय अधिकारी (मक्ता-2)
श्रीम. धनश्री अरुण गोसावी, प्रशासकीय अधिकारी (वाटप व संगणक)

माहितीचा अधिकारी अधिनियम 2005 अंतर्गत, सहाय्यक आयुक्त (मालमत्ता‍) खात्या मधील प्रथम अपिलीय अधिका-यांची नावे, पदनामे

श्री. (डॉ.) पृथ्वीराज चतुरसिंग चौहान, सहाय्यक आयुक्त (मालमत्ता)
श्री. ललितकुमार करमचंद्र शहा, कार्यकारी अभियंता (कार्यव्यवस्थेअंतर्गत)
७. कार्यालयीन लैंगिक शोषण प्रतिबंधक समिती निरंक
८. महत्वाची साध्य केलेली कामे १) प्रकल्पबाधित पात्र प्रकल्पग्रस्तांना अंदाजे एकूण १९,५१७ निवासी पीएपी सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
२) विकास नियंत्रण नियमावलीतील सुधारित 33(7) अंतर्गत महापालिकेच्या भाडेकरू मालमत्तांचा पुनर्विकास करण्याबाबतची सुधारित मार्गदर्शक तत्त्वे.
३) भुईभाडे, मालमत्ता अधिमूल्य, एकरकमी अधिमूल्य, पुनर्विकास प्रकल्पाद्वारे प्राप्त झालेले भांडवली मूल्य यांची आर्थिक वर्ष २०१६-१७ (३१ जानेवारी २०१७ पर्यंत) मधील वसुली रु. ३७५.६० कोटी व आर्थिक वर्ष २०१५-१६ मधील वसुली रु. ४३२.३२ कोटी.
४) मालमत्ता खात्याचे संगणकीकरण सुरू झाले आहे. महापालिकेच्या भाडेपट्टयावरील मालमत्ता व रिक्त भूभाग भाडेपट्टयावरील मालमत्तांचे सर्व करारपत्रे FTP Server वर प्रदर्शित केले आहेत.
९. विशेष महत्वाच्या घटना निरंक
१०. इतर कार्यालयीन माहिती निरंक
शेवटचे अद्ययावत १५/०२/२०१७