रचना

शिक्षण समिती 26 सदस्यांची मिळून बनलेली असेल आणि त्यापैकी 22 सदस्य नगरसेवक असतील आणि चार सदस्य हे नगरसेवक नसतील(कलम 50ह).बिगर पालिका सदस्य म्हणून नेमणूक करावयाच्या व्यक्ती या ज्यांची नावे महानगरपालिका मतदार यादीत मतदार म्हणून दाखल झालेली आहेत, ज्या महानगरपालिकेने याबाबत मान्यता दिलेल्या विद्यापीठाच्या स्नातक आहेत, ज्यांना शैक्षणिक परिसंस्थेतील अध्यापनाचा किंवा प्रशासनाचा पाच वर्षाचा अनुभव आहे आणि ज्यांना महानगरपालिका याबाबत निधर्नारित करील अशा इतर अर्हमा आहेत अशा व्यक्ती असतील.

सार्वत्रिक निवडणुकीनंतर महानगरपालिकेच्या पहिलया सभेच्या वेळी यथोचित अर्हताप्राप्त अशा 22 व्यक्तींची नेमणूक शिक्षण समितीचे सदस्य म्हणून करील.(कलम 50आय). शिक्षण समितीच्या सदस्यांपैकी नगरसेवक असलेल्या सदस्यांपैकी निम्मे सदस्य आणि इतर सदस्यांपैकी निम्मे सदस्य दरवर्षी 1 एप्रिल रोजी मध्यान्ही सेवानिवृत्त होतील. शिक्षण समितीची रचना करण्या आल्यानंतर लगतनंतर येणा-या 1 एप्रिल रोजी कोणते सदस्य सेवानिवृत्त व्हावेत हे सभापती निकटपूर्वीच्या फेब्रुवारी पूर्वी सभापती निधर्नारित करील अशा वेळी व अशा रितीने चिठ्ठया टाकून ठरविल. (कलम 50के). महानगरपालिका मार्च महिन्यातील तिचया सामन्य सभेत उपरोक्तप्रमाणे वेळोवेळी जे सदस्य सेवानिवृत्त होणार असतील त्यांची अधिकारपदे भरण्यासाठी शिक्षण समितीचया नवीन सदस्यांची नेमणूक करील.

कामकाज

शिक्षण समिती आपले कामकाज चालविणयासाठी आपल्या सभा मुख्य महानगरपालिका कार्यालयात भरवील व तिला अश सभांच्या संबंधात आणि तिच्या नियंत्रणाखालील शाळांच्या व्यवस्थापनाच्या संबंधात पुढील शर्तीच्या अधीनतेने वेळोवेळी विनियम करता येतील.(कलम 50पी).

शिक्षण समितीची सभा महिनयातून एकदा आणि आश्यक वाटल्यास अशा इतर वेळी भरविणयात येईल (पोटकलम (अ). (प्रत्येक सभेची सूचनेमध्ये दिवस, वेळ आणि ठिकाण आणि महानगरपालिका चिटणीसांनी तयार केलेले (कार्यक्रमपत्रिका व सहपत्र) सदस्यांना त्यांच्या निवासस्थानी पाठविणे.)

शिक्षण समितीची पहिली सभा महापौर निश्चित करतील त्या दिवशी व त्या वेळेला घेण्यात येईल(पोटकलम (ब)).

शिक्षण समितीच्या सभापतीस योग्य वाटेल त्या त्या वेळी उक्त समितीची विशेष सभा बोलाविता येईल आणि समितीच्या सदस्यांपैकी चारपेक्षा कमी नसतील इतक्या सदस्यांनी सहिनिशी लेखी मागणी केली असता सभापती कोणतेही कामकाज चालविणयासाठी अठ्ठेचाळीस तासांच्या आत विशेष सभा बोलाविल (पोटकलम (क)).

शिक्षण समितीच्या सभेस सुरुवातीपासून अखेरपर्यंत निदान 9 सदस्य उपस्थित असल्याखेरीज त्या सभेचे कोणतेही कामकाज चालविण्यात येणार नाही.(पोटकलम (ड)).

आयुक्तांस आणि शिक्षणाधिकारी यांस समितीच्या सभेस उपस्थित राहण्याचा आणि त्यात होणा-या चर्चेत भाग घेण्याचा हक्क असून मात्र त्यास अशा सभेत कोणत्याही प्रस्तावार मतदान करण्याची किंवा तो मोडण्याची मुभा असणार नाही. (कनम 50क्यू).

मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 च्या कलम 4 अन्वये शिक्षाण समिती ही एक महानगरपालिका प्राधिकरण आहे शिक्षण समिती प्रशासनामार्फत घेण्यात येणा-या शैक्षणिक कार्यक्रमांसंबंधी निर्णय देते. शिक्षण समिती अर्थसंकल्पीय अंदाज ‘ई’ स्थायी समितीद्वारा महानगरपालिकेस अंतिम संमतिकरिता पाठविते.