१. | विभागाचे नाव | प्रमुख अभियंता (पाणी पुरवठा प्रकल्प) |
२. | विभागीय सेवा | पाणी पुरवठा वृध्दिंगत करणे. नवीन पाण्याचे स्त्रोत विकसीत करण्यासाठी नियोजन करणे. धरणांचे बांधकाम करणे, जलवहनासाठी जलबोगदे तसेच नवीन मुख्य जलवाहिन्यांचेबांधकाम करणे, नवीन उदंचन केंद्र/उपकेंद्रांचे बांधकाम करणे, जलप्रक्रिया केंद्र (हरिणीकरण केंद्रासहित) आणि पाण्याच्या गुणवत्ता वाढीसाठी शहरात सेवाजलाशय व मुख्यजलवाहिण्यांचे जाळे तयार करण्याशी निगडीत इतर सर्व कामे. |
३. | महत्वाच्या कार्यालयांची यादी | अ) प्रमुख अभियंता (पाणी पुरवठा प्रकल्प) यांचे कार्यालय, अभियांत्रिकी हब इमारत, वरळी, मुंबई - ४०० ०१८ ब) उप कार्यालय - 5 बी भांडार, भांडुप संकुल,दर्गा रोड,खिंडी पाडा मुलुंड,(पश्चिम) मबुंई 400082. क) उप कार्यालय - बाळकुम, जकात नाक्याजवळ, ठाणे भिवंडी रोड, ठाणे (प) - ४०० ६०८ ड) उप कार्यालय - उप प्रमुख अभियंता (पा.पु.प्र.) प्र.नि.नि.क. यांचे कार्यालय, ३१८, महानगरपालिका जी/उत्तर विभाग कार्यालय इमारत, हरिश्र्चंद्र येलवे मार्ग, दादर (प),मुंबई - ४०० ०२८ |
४. | महत्वाच्या उभारणीची व जोडणीची यादी | १. वेल्लन संहत कॉक्रीट धरणाचे बांधकाम २. मोडकसागर येथे कूपक अंतर्भूत करुन, मोडकसागर ते बेलनाला दरम्यान जलवहन बोगदा ३. अघई ते गुंदवली दरम्यान जलवाहिनी टाकण्याचे काम ४. भांडूप संकूल येथे जलप्रक्रिया केंद्र. ५. भांडूप संकूल आणि पांजरापूर येथे उदंचन केंद्र. ६. भांडूप संकूल आणि येवई येथे महासंतुलक जलाशय |
५. | चालू असलेले प्रकल्प | १. विहार जल प्रक्रिया केंद्राची सुधारणा. २. चितळे समितीच्या शिफारशीनुसार गारगाई व पिंजाळ धरणे आणि दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प विकसीत करणे. ३. पवई ते वेरावली आणि पवई ते घाटकोपर उच्चस्तर जलाशय आणि पुढे घाटकोपर निम्नस्तर जलाशयापर्यंत जलबोगदयाचे बांधकाम. ४. दोन जलबोगद्यांच्या कामांसाठी सल्लासेवा (मे. टी.सी.ई. ) अ) अमर महल ते ट्रॉम्बे जलाशयापर्यंत जल बोगदा. ब) चेंबूर ते वडाळा आणि पुढे परळपर्यंत जलबोगदा. ५. पांजरापूर येथील जलप्रक्रियाकेंद्रासाठी बर्हिगामी प्रक्रियाकेंद्र उभारणे - यांत्रिकी आणि विद्युत कामे ६. भांडुपसंकुल येथे जलबोगदयाच्या कूपकापासून ते जलप्रक्रिया केंद्रापर्यंत व प्रस्तावित ब्रेक प्रेशर टॉवरपर्यंत जलवाहिन्या पुरविणे व उभारण्याचे काम. |
६. | माहितीचा अधिकार प्रथम चौकशी अधिकारी आणि प्रथम अपिल अधिकारी | माहिती अधिकार आणि प्रथम अपील अधिकारी यादी |
७. | कार्यालयीन लैगिंक शोशन प्रतिबंधक समिती | समिती सदस्यांची यादी |
८. | महत्वाची साध्य केलेली कामे | १. वेल्लन संहत कॉक्रीट धरणाचे बांधकाम. २. मोडकसागर येथे कूपक अंतर्भूत करुन, मोडकसागर ते बेलनाला दरम्यान जलवहन बोगदा. ३. अघई ते गुंदवली दरम्यान जलवाहिनी टाकण्याचे काम. ४. भांडूप संकूल येथे जलप्रक्रिया केंद्र. ५. भांडूप संकूल आणि पांजरापूर येथे उदंचन केंद्र. ६. भांडूप संकूल आणि येवई येथे महासंतुलक जलाशय. ७. बोगदा खोदाई यंत्र तंत्रज्ञानाने, आजमितीपर्यंत 84 कि.मी. लांबीचे जलबोगदे पूर्ण होऊन कार्यान्वित झाले आहेत. सद्यस्थितीत ६.६ कि.मी. लांबीच्या जलबोगदयाचे काम सुरु आहे व नजिकच्या भविष्यकाळात मुंबईसाठी पाणी पुरवठा वृध्दिंगत करण्यासाठी १२४ कि.मी. (१५ कि.मी. शहर विभागात व १०९ कि.मी. शहरबाहय विभागात) लांबीच्या जलबोगदयांची कामे प्रस्तावित आहे. |
९. | विशेष महत्वाच्या घटना | १. मध्य वैतरणा धरणाचे बांधकाम विक्रमी वेळेत म्हणजेच १५ महिने १५ दिवसांमध्ये पूर्ण झालेले आहे ज्यामुळे या धरणाला जलदगतीने बांधले गेलेले जगातील ९ वे धरण म्हणूनही गौरविण्यात आलेले आहे. २. वर्ष १९८३ मध्ये बोगदा खोदाई यंत्र तंत्रज्ञानाने जलबोगदे बांधणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ही भारतातील प्रथम सार्वजनिक संस्था आहे. आजमितीपर्यंत 84 कि.मी. लांबीचे जलबोगदे पूर्ण होऊन कार्यान्वित झालेले आहेत. |
१०. | ईतर कार्यालयीन माहिती | N.A |
| |