1. | विभागाचे नाव | टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बा.य.ल. नायर धर्मा रुग्णालय |
2. | विभागीय सेवा | आरोग्य सेवा बा.य.ल. नायर धर्मा.रुग्णालय व टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा केंद्र आहेत. रुग्णालयात 1800 खाटांची सोय आहे. येथे रोगाचे खात्रीलायक निदान करण्यासाठी विशिष्ट व अतिविशिष्ट सेवा उपलब्ध आहेत. तसेच उत्तम रुग्णसेवा पुरविली जाते. वैद्यकीय शिक्षण बा.य.ल. नायर धर्मा रुग्णालय व टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अनेक वैद्यकीय व संलग्न वैद्यकीय अभ्यासक्रमांचे विस्तारीत प्रशिक्षण दिले जाते. |
3. | महत्वाच्या कार्यालयांची यादी | अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल |
4. | महत्वाच्या उभारणीची व जोडणीची यादी | अतिविशिष्ट सेवा विभाग हृदयरोग, हृदयरोग शस्त्रक्रीया, मधुमेह व अंतरस्त्राव ग्रंथीरोग, जठरांत्ररोग, वैद्यकीय कर्करोग उपचार, मुत्रपिंडरोग उपचार, मज्जातंतूशास्त्र, संधिवात शास्त्र, रुधिराभिसरणशास्त्र, मज्जातंतूशल्यचिकित्सा, बालरोगशस्त्रक्रीया, सुघटनशल्यचिकितसा व भाजणे, मुत्रपिंडशल्यचिकितसा, मुत्रपिंडप्रत्यारोपण अध्ययन अक्षमता विभाग, स्वमग्न (ऑटिझम) इत्यादी. रोगनिदान सेवा विभाग व सोयी सी.टी.स्कॅन, एम.आर.आय. स्कॅन, किरणोत्सर्गी वैद्यकीय चिकित्सा, किरणोत्सर्गी उपचार उपलब्ध आहेत. खालील अत्याधुनिक प्रयोगशाळा रोगनिदान करण्यास कार्यरत आहेत विकृतिशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जीवरसायनशास्त्र |
5. | चालू असलेले प्रकल्प | 1) शरदिनी डहाणूकर वाटीकेजवळ नवीन इमारतीमध्ये कर्करोगाने पिडीत रुग्णांसाठी लिनियर ऍक्सिलरेटर नावाची उपचार पध्दती कार्यान्वित करण्याचा प्रकल्प. 2)L आकाराची इमारत उभारण्याचा प्रकल्प ज्यामध्ये खालील विभाग हलविणयात येतील भौतिकोपचार, व्यवसायोपचार, श्रवणशास्त्र व वाक्विकृती चिकित्साशाळा, वैद्यकीय नोंदणीखाते, उपहारगृह इत्यादी. 3) पदव्यूत्तर विद्यार्थ्यांसाठी हाजीअली येथे नवीन वसतीगृहाची इमारत प्रकल्प निश्चिती करण्यात आली आहे. 4) बुधरानी धर्मादाय संस्थेच्या मदतीने कर्करोग उपचार विभागाच्या दिवससेवा केंद्राचा विसतार करुन 75 खाटांची सोय करण्याचा प्रकल्प 5) दहा खाटांची सोय असलेला नविन न्युरोसर्जरी अतिदक्षता विभाग. |
6. | माहितीचा अधिकार प्रथम चौकशी अधिकारी आणि प्रथम अपिल अधिकारी | जनमाहिती अधिका-याचे नाव व पदनामः डॉ. गौतम काळे (प्रभारी सहाय्यक अधिष्ठाता) अपिलीय अधिका याचे नावः श्रीमती डॉ. पंकजा आगल (प्रभारी उपअधिष्ठाता) |
7. | कार्यालयीन लैगिंक शोशन प्रतिबंधक समिती | डॉ. मेधा अंबिये : अध्यक्ष डॉ. अनुराधा कान्हेरे: सचिव इतर सदस्य- प्रभा तिरमारे, डॉ. पुष्पा पाझारे, डॉ. संजाना, डॉ. सुदाम सुर्यवंशी, डॉ. वंदना तांडेल, डॉ. राकेश भदाडे, श्रीमती भगत, श्रीमती ज्योती भाटे, रमेश कदम, श्रीमती निर्मल जोगाडीया. |
8. | महत्वाची साध्य केलेली कामे | 1) आठ जुलै 2016 रोजी हृदयरोग अतिदक्षता विभागाचा विस्तार व नुतनीकरण आठ वाढीव खाटांची सोय, नवीन कार्डियाक कॅथेटरायझेशन प्रयोगशाळा कार्यान्वित. 2) रूग्णालयातील खाटांची संख्या 1800 पर्यंत वाढविण्यास प्रशासकीय मंजूरी. 3) बुधरानी धर्मादाय संस्थेच्या सहकार्याने कान, नाक घसा विभागात डोके, चेहरा व मानेच्या कर्करोग रूग्णांसाठी 11 खाटांचा अतिदक्षता विभाग कार्यान्वित. 4) डिसेंबर 2015 मध्ये रूग्णालयात 11 वाढीव शस्त्रक्रिया खोल्या कार्यान्वित. 5) टो.रा. वैद्यकीय महाविद्यालयात वाढीव 47 शैक्षणिक पदे निर्माण करण्यास प्रशासकीय मंजूरी. |
9. | विशेष महत्वाच्या घटना | संस्थेचा 96 वा स्थापनादिन 4 सप्टेंबर 2016 रोजी साजरा करण्यात आला |
10. | ईतर कार्यालयीन माहिती | संस्थेची सविस्तर माहिती पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहे - www.tnmcnair.com |
| |